
मंचर प्रतिनिधी
मनात जिद्द आणि मेहनत करायची तयारी असेल तर कोणतेही स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागत नाही. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथील विशाल झुंबर भांड या तरुणाने मनाशी पक्कं ठरवलं आणि अधिकारी होण्यासाठी त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली त्याचे प्रयत्न इतके प्रामाणिक होते की त्यामुळे तो परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात पास झाला आणि कृषी अधिकारी श्रेणी 2 पदाला गवसणी घातली आहे
विशाल भांड यांची प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण जारकरवाडी येथे झाले. इयत्ता दहावीत विशालने ९२% गुण संपादन करून जारकरवाडी येथील आदर्श विद्यालय प्रथम आला होता बारावी सायन्स मंचर ( ता. आंबेगाव ) येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले बी एस्सी शिक्षण रत्नागिरी जवळील महाड येथे झाले तर एम एस्सी शिक्षण नागपूर येथे झाले विशाल भांड सध्या जळगाव येथे कृषी सहाय्यक म्हणून सेवा करत आहे

विशालचे कुटुंब सर्व सामान्य शेतकरी आहेत
शिक्षण करतानाच त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. यादरम्यान त्याने स्पर्धा परीक्षा देऊन त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मोठं यश मिळवलं आहे. विशालच्या या यशाबद्दल जारकरवाडी ग्रामस्थांनी विशालचे अभिनंदन केले आहे.





