spot_img
spot_img
spot_img

अरुण गिरे शिवसेना शिंदे गटात दाखल

मंचर

आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथांना वेग आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी आज ( दि. १९ ) रोजी पुण्यात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री,.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेत्या, विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष डॉ.निलमताई गोऱ्हे यांच्या शुभहस्ते पुणे येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे

यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे शिवसेना सचिव रामभाऊ रेपाळे, , आमदार शरददादा सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख देविदास दरेकर, भगवान पोखरकर, रमेश कोंडे, युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना युवानेते रमेशभाऊ येवले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, सरपंच रविंद्र वळसे पाटील, युवासेना तालुका अध्यक्ष योगेश थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

अरूण गिरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवाजी आढळराव यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय काम करत असताना पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटात उमेदवारी मिळेल अशी आशा अरुण गिरे यांना होती परंतु तसे झाले नाही.

अरुण गिरे यांनी पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटात लढण्यासाठी तयारी केली होती परंतु पक्षाकडून दुय्यम वागणुक मिळाली तसेच असल्याचे मंचर येथे पत्रकार विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी डावलण्यात येत असल्याचे अरुण गिरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले अरुण गिरे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असला तरी शिंदे गटाचे निरगुडसर गावचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र वळसे यांनी पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटात निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण केली आहे.

अरुण गिरे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटात अनेक विकासकामे केली आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटात रविंद्र वळसे की अरुण गिरे नक्की कोण उमेदवार याबाबत चर्चांना मतदारसंघात उधाण आले आहे पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटात एकास एक निवडणूक होती किंवा दुरंगी तिरंगी निवडणूक होती हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या