मंचर प्रतिनिधी
धामणी(तालुका आंबेगांव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाचा व खंडोबा.म्हाळसाई.व बाणाईच्या सर्वांगसुंदर मुखवट्यांना रूद्राभिषेक व दुग्धाभिषेक करुन पञी फूल पूजा सोहळा उत्साहात शनिवारी( २६सप्टेबर २६) साजरा झाला.भाद्रपद पौर्णिमेनिमित्तच्या पारंपारिक पञी पूजेला मंदिराचे मुख्य गाभाऱ्यात सुगंधी फुलांची व फळांची आरास करण्यात आली होती. यामुळे मंदिर परिसर भक्तिने आणि सुगंधाने न्हाऊन निघाला होता.
भाद्रपद महिण्यातील पौर्णिमेच्या मुहर्तावर शनिवारी शेकडो भाविकांनी “सदानंदाचा येळकोट,जय मल्हारच्या नामघोषात धामणी (तालुका आंबेगांव) येथील पुरातन श्री म्हाळसाकांत खंडोबाचे दर्शन घेतले. धामणीच्या पुरातन खंडोबा मंदिरात पहाटे चार वाजता घंटानाद झाला.त्यानंतर आठ यजमान जोडप्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक व रुद्राभिषेक संपन्न झाला. यावेळी खंडेराय. म्हाळसाई. बाणाई व जोगेश्वरीच्या देखण्या मूर्तीना वस्रालंकार व सुंगधी फुलांचे हार घालण्यात आल्यानंतर देवस्थानाचे सेवेकरी मंडळी यांच्याकडून स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या सर्वांगसुंदर देखण्या खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या मुखवट्यावर सुवासिक केशर व सुंगधी दवण्याचे अत्तरमिश्रित केलेल्या पञीच्या पानाचे लेपन करण्यात आले.
त्यानंतर खंडेरायाला नैवेद्य दाखवण्यात येऊन शेकडो भाविकांच्या उपस्थितीतआरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. भाद्रपद महिण्यातील पौर्णिमेच्या निमित्ताने पंचक्रोशीतील भाविक खंडोबाचे, दर्शनासाठी व तळी भंङार करण्यासाठी कुटुंबियासह आलेले दिसत होते.





