spot_img
spot_img
spot_img

पूर्व आंबेगावात गणरायाला भावपूर्ण निरोप

मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, लाखणगाव, देवगाव, लोणी, धामणी आदी गावांमध्ये गणेशोत्सवाची सांगता भक्तिमय वातावरणात झाली. गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

गणेशोत्सवाच्या कालावधीत विविध गणेश मंडळांकडून आकर्षक तसेच सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करण्यात आले होते. या देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि गणेशभक्तांचा उत्साह यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांत गणेश मंडळे, ग्रामस्थ आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

Related Articles

ताज्या बातम्या