spot_img
spot_img
spot_img

धामणीचे सुपुत्र राजेंद्र शेळके कल्याणचे प्रांताधिकारी

 

मंचर प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील राजेंद्र शेळके यांची ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे प्रांताधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे शेळके यांनी यापूर्वी पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी म्हणून सन २०२३ पासून तीन वर्षे सेवा बजावली आहे उपजिल्हाधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर प्रशासनाला आधुनिक, पारदर्शक आणि भाविककेंद्री दिशा देण्याचे काम केले. मंदिर व परिवार देवतांच्या जतन-संवर्धनाला त्यांनी विशेष प्राधान्य दिले.

भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी व्हीआयपी दर्शनावर निर्बंध, टोकन दर्शन प्रणाली, ऑनलाइन पूजा सुविधा तसेच भक्तनिवासाच्या संगणकीकृत बुकिंगची व्यवस्था करण्यात आली. दर्शन रांगेतील भाविकांसाठी जर्मन हॅंगरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. भविष्यातील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन स्कायवॉक तसेच दर्शन हॉलच्या कामालाही सुरुवात करण्यात आली.

शेळके यांच्या कार्यकाळात चार आषाढी यात्रांचे नियोजन, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची कार्यवाही, तुळशी अर्चन पूजा सुरू करणे तसेच निरुपयोगी दोन भाविकांना सहभागी होण्याची संधी देणे, आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आवश्यक मनुष्यबळासाठी ई-निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली.

कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजेंद्र शेळके यांची कल्याण, जिल्हा ठाणे येथे प्रांताधिकारी म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागी श्रीकांत यादव यांची मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शेळके यांचा मंदिर समिती व कर्मचाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या