spot_img
spot_img
spot_img

शिरदाळे येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,  खाऊ वाटप

 

मंचर प्रतिनिधी 

शिरदाळे (ता. आंबेगाव) : शिरदाळे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ ग्रुपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.

लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील सामाजिक हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. साहित्य व खाऊ मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी ग्रामस्थ, महिला भगिनी तसेच ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ ग्रुपच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून शिरदाळे गावातील तलाव परिसर तसेच वनविभागाच्या जागेत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली आहे. लावलेल्या झाडांचे नियमित संवर्धन व संगोपनही केले जात आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती ग्रुपचे सदस्य सुशांत तांबे यांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या