spot_img
spot_img
spot_img

रांजणी येथे भव्य रोजगार मेळावा संपन्न टाटा मोटर्सकडुन ५५ युवकांना जागेवर नियुक्तीपत्र

 

मंचर प्रतिनिधी

रांजणी (ता. आंबेगाव) – स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रांजणी येथे शनिवार, दिनांक २१ मार्च रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पंचायत समिती सदस्या सौ. प्रियांका केतन वाघ आणि केतन वाघ यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला होता.
या मेळाव्यात देशातील अग्रगण्य वाहन निर्मिती कंपनी टाटा मोटर्स सहभागी झाली होती. कंपनीकडून अरविंद काळे, गोवर्धन पांचाळ तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे मुलाखत पथक उपस्थित राहून उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली.

या रोजगार मेळाव्यास सुमारे २५० हून अधिक युवक-युवतींनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५५ पात्र उमेदवारांची निवड करून त्यांना टाटा मोटर्सकडून जागेवरच नियुक्तीपत्र (जॉइनिंग लेटर) देण्यात आले. त्यामुळे अनेक युवकांच्या रोजगाराचा मार्ग मोकळा झाला आहे.
रांजणी व परिसरातील पंचक्रोशीत प्रथमच अशा प्रकारचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याने स्थानिक युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुका अध्यक्ष धोंडीभाऊ भोर, शिवसेना तालुका अध्यक्ष प्रवीण थोरात, जिल्हा परिषद सदस्या प्रीती थोरात, तालुका कार्याध्यक्ष गणेश यादव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष केतन वाघ यांनी उपस्थित मान्यवर, टाटा मोटर्सचे अधिकारी तसेच सहभागी युवक-युवती यांचे आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या