spot_img
spot_img
spot_img

विठ्ठल बाळकृष्ण दरेकर यांचे निधन

 

मंचर  (प्रतिनिधी) : दरेकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ज्येष्ठ नागरिक कै. विठ्ठलराव (जनार्दन) बाळकृष्ण दरेकर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी सोमवार दि. २३ मार्च २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

ते व्यावसायिक होते व शेतकऱ्यांशी त्यांचा दांडगा संपर्क होता. दरेकरवाडी गावाच्या जडण-घडणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. शांत, साधेपणा जपणारे आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.

ते पत्रकार गिरीश दरेकर, उद्योजक अविनाश दरेकर, संतोष दरेकर व निलेश दरेकर यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सोमवार दि. २३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता घोडनदीच्या पवित्र तीरावर, घोडगाव (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे करण्यात येणार आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या