मंचर :धामणी(तालुका आंबेगांव) येथील पुरातन श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात मंगळवारी (दिं.३ मार्च)फाल्गुन पौर्णिमा(धुलीवंदन)निमित्ताने गाभार्यात फुलांची आकर्षक सजावट करुन स्वयंभू सप्तशिवलिंगाची पारंपारिक श्रीखंड पूजा करण्यात आली.यावेळी सेवेकरी.भाविक.ग्रामस्थ उपस्थित होते
झेंडू.अष्टर.फुलांनी केलेली गाभार्यांची सजावट.स्वयंभू सप्तशिवलिंगाला केलेला सुवासिक अत्तर व केशरमिश्रित भंडार्याचा लेप व त्यावर सप्तरंगाची उधळण करण्यात आली व वस्रालंकाराने सजवलेली खंडोबा.म्हाळसाई.व बाणाईची लोभस मूर्ती पाहून उपस्थित भाविक सुखावल्याचे पाहायला मिळाले.
पहाटे धामणीच्या खंडोबा देवस्थान मंदिर व परिसरात कपाळभर भंडारा लावून सदानंदाचा येळकोटचा जयघोष करुन भल्या पहाटे नऊ जोडप्यांच्या हस्ते स्वयंभू सप्तशिवलिंगाला दुग्धाभिषेक व रुद्राभिषेक घालण्यात आला त्यानंतर आरती होऊन दर्शनासाठी मंदिर भाविकांना खुले करण्यात आले.





