मंचर प्रतिनिधी
कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील घोडशाखा कालव्यातील थोरांदळे, खडकी, नागापूर, जाधववाडी आदी गावांतील पोट चार्यांना मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे झुडपे वाढली होती सदर गावातील पोट चार्यांवरील वाढलेली मोठ्या प्रमाणातील काटेरी झाडे झुडपे काढावी अशी मागणी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे तालुका युवक अध्यक्ष विशाल जालींदर वाबळे यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगाव यांना दिले होते
काटेरी झाडे झुडपे वाढल्याने चारीतील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला होता त्यामुळे भविष्यात कालवा व पोट चारीला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे विशाल वाबळे यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन थोरांदळे, खडकी नागापूर जाधववाडी आदी गावांतील जलसंपदा विभागाने यंत्राच्या साह्याने झाडेझुडपे काढून पोट चाऱ्या मोकळ्या केले आहेत यावेळी जलसंपदा विभागाचे कर्मचारी अधिकारी ,मानकादेवी पाणी वाटप संस्था खडकी चेअरमन भिमाजी खंडू पोखरकर, अनिल धोंडीभाऊ पोखरकर, अक्षय दादाभाऊ पोखरकर विलास गणपत टेमगिरे, वेदांत संतोष टेमगिरे, राज संतोष टेमगिरे उपस्थित होते.





