मंचर प्रतिनिधी
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांना साखर वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) येथे (दि. २) रोजी साखर वाटप करण्यात आली भीमाशंकर कारखान्यांकडून गावोगावी साखर वाटपाचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी कारखाना प्रशासनाकडून नुकतेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार संबंधित गावांमध्ये साखर वाटप केले जाणार आहे. काही कारणास्तव ज्या सभासदांना अथवा ऊस उत्पादकांना गावामध्ये साखर मिळू शकणार नाही, त्यांच्यासाठी कारखान्याच्या कार्यस्थळावर साखर वाटपाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील, कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व व्हाईस चेअरमन ॲड. प्रदीप वळसे पाटील संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली साखर वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी खा. वि.संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज पोंदेवाडी माजी उपसरपंच संदीप पोखरकर आंनदा पोंदे यावेळी उपस्थित होते.
सर्व ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांना वेळेत साखर मिळावी, यासाठी कारखाना प्रशासन प्रयत्नशील असून, निर्धारित वेळापत्रकानुसार साखर वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आले.