spot_img
spot_img
spot_img

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा शुक्रवारी मोर्चा.

मंचर प्रतिनिधी 

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने-ज्यूनिअर कॉलेज
( जुक्टो) शिक्षकांच्या संच मान्यतेचे प्रचलित निकष बदलण्यात येऊ नयेत,या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयावर शुक्रवारी (ता.४) रोजी सकाळी अकरा वाजता शनिवारडा-पुणे येथून मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंतचे जवळपास तीन हजार शिक्षक या मोर्चात सहभागी होणार आहेत.

कनिष्ठ महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या संच मान्यता देताना गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेले निकष शिक्षण खात्याने कोणतेही आदेश न काढता बदलले आहेत. ५० वर्षांपासून सुरू असलेल्या कार्यपद्धतीला एकाकी पद्धतीने छेद देण्यात आला. आता २०२५-२६ च्या संच मान्यतेमुळे राज्यात १० हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची संख्या कमी झाली आहे.

तात्पुरत्या सेवेतील शिक्षक, शिक्षण सेवक यांच्या सेवा समाप्त झाल्या असून, काही कायम शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. एकट्या कोल्हापूर विभागात ४०० शिक्षक अतिरिक्त झाल्याची यादी जाहीर झाली. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. या विद्यार्थ्याच्या नूकसानीला जबबधार कोण ? असे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ.संजय शिंदे व सरचिटणीस प्रा.लक्ष्मण रोडे यांनी सांगितले आहे.

पुणे जिल्हयातून शिक्षकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा.विक्रम काळे, सरचिटणीस प्रा.हिंमत तोबरे, सहसरचिटणीस प्रा.रामानंद वळसे पाटील यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या