मंचर प्रतिनिधी
काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शालेय दप्तराचे वाटप करण्यात आले. यावेळी एकूण 45 विद्यार्थ्यांना या दप्तराचे वाटप करण्यात आले.
काठापुर बुद्रुक ता. आंबेगाव या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाप या दोन्ही शाळेमधील 45 विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे वाटप करण्यात आले.हे वाटप विविध कार्यकारी सहकारी सोसायट काठापुर बुद्रुक या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले. गेल्या तीन वर्षापासून शाळेत दाखल होणारे विद्यार्थ्यांना दरवर्षी सोसायटीच्या माध्यमातून दप्तराचे वाटप करण्यात येते. याही वर्षी 45 विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले.
तसेच गावात असणाऱ्या तीनही अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप स्वातंत्र्य दिनापूर्वी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सोसायटीचे चेअरमन कुंडलिक जोरी, व्हाइस चेअरमन संतोष करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे, पोलीस पाटील अमोल करंडे,सोसायटी संचालक पंढरीनाथ करंडे,कैलास टिंगरे, रवींद्र करंडे,अशोक जाधव,शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष सागर जाधव, सागर शेटे, उपाध्यक्ष विशाल कानसकर, सचिन नरे, राजेंद्र जोरी, मुख्याध्यापक नंदकुमार चासकर,संजय घोटकर यांसह पालक विद्यार्थी उपस्थित होते.





