spot_img
spot_img
spot_img

नागपंचमीनिमित्त लोणीत रंगला कलगीतुरा कलगीवाले तान्हाजी माळवदकर तुरेवाले साहेबराव पवार यांच्या सवाल जबाबाने कार्यक्रमात रंगत

मंचर प्रतिनिधी 

लोणी (ता. आंबेगाव) येथे राज्यातील भव्य कलगीतुरा सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे 34 वे वर्ष होते. कलगीतुरा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी बाजारतळ गर्दीने फुलून गेला होता. शाहीर साहेबराव पवार तुरेवाले ( किन्ही करंडी ) विरुद्ध शाहीर तान्हाजी माळवदकर कलगीवाले (गुळुंचवाडी बेल्हे) यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला.

ढोलकी, टाळ, डफ, संबळ व तुणतुण्याच्या तालावर रंगलेला हा जंगी सामना उपस्थित रसिकांच्या मनात व कानात ज्ञानाची भर टाकून गेला. डफाची थाप, ढोलकीचा गगनभेदी आवाज, शाहिरांनी पहाडी आवाजात सादर केलेली कवने उपस्थितांची दाद घेऊन जातात. देशभक्ती, सर्वधर्मसमभाव, मातृ-पितृभक्ती, विविध धार्मिक सवाल-जबाब या विषयांवर सादर झालेली कवने यांनी उपस्थितांचे डोळे पानवले.

गणगौळण, रामायण, महाभारत, पुराणकथा, शास्त्रीय सवाल, गणिती सवाल व लौकिक सवाल अशा विविध विषयांवर कलगीवाले व तुरेवाले यांचा सवाल चांगलाच रंगला. कार्यक्रम पाहण्यासाठी पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा तालुक्यातील व लोणी- धामणी परिसरातील श्रोत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

 

 

या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेत्यांनी सदिच्छा भेटी दिल्या. सूत्रसंचालन माजी सरपंच उद्धव लंके यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या