spot_img
spot_img
spot_img

श्री संत सटवाजीबाबा दिंडी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ.

मंचर प्रतिनिधी 

लोणी (ता.आंबेगाव ) येथून श्री संत सटवाजीबाबा दिंडी सोहळ्याचे ” ज्ञानोबा माऊली तुकारामा ” च्या जयघोषात भक्तिमय वातावरणात लोणीकाळभोर मार्ग पंढरपूर कडे प्रस्थान झाले.
तत्पूर्वी लाखणगाव येथून आहेल्या दिंडी सोहळ्याचे लोणी ग्रामस्थांनी भक्तीमय वातावरणात स्वागत केले.

यावेळी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या माता भगिनी, वारकरी लोणी गावचे ग्रामदैवत शंभोमहादेवाच्या मंदिरामध्ये हरिपाठ,आरती करून दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उद्धव लंके,रंजना लंके,वैशाली आदक पाटील व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

हा दिंडी सोहळा लोणी काळभोर या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या दिंडी सोहळ्यात सहभागी होणार असून तेथून हा दिंडी सोहळ पंढरपूरकडे मार्गस्थ होईल असे उद्धव लंके यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या