spot_img
spot_img
spot_img

अवसरी बुद्रुक दहावीचा निकाल १०० % शंभर टक्के निकालाची परंपरा कायम, बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९८.८७%

मंचर प्रतिनिधी 

अवसरी बुद्रुक ( ता. आंबेगाव ) येथील इयत्ता दहावीचा निकाल १००% लागला असून विद्यालयाने दहावीचा १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे

तसेच बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९८.८७% लागला आहे अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य सुरेश जारकड यांनी दिली आहे

फेब्रुवारी मार्च २०२६ मध्ये झालेला [HSC] परीक्षेसाठी ८९विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी ८८विद्यार्थी उत्तीर्ण झाले

प्रथम क्रमांक कुमारी समृद्धी कमलेश सिनलकर ८१.५०% द्वितीय क्रमांक कुमारी पायल प्रवीण खिलारी ७३.५०% तृतीय क्रमांक वैष्णवी लक्ष्मण शेळके ७३.१७% त्याचप्रमाणे

फेब्रुवारी मार्च २०२६ मध्ये इयत्ता दहावीचा(HSC) परीक्षेसाठी २०५विद्यार्थी परीक्षेसाठी बसली होती त्यामध्ये सर्व २०५विद्यार्थी उत्तीर्ण झाले

त्यामध्ये१००%निकाल लागला प्रथम क्रमांक कुमारी प्रांजल नरेंद्र बोंबे९६.८०% दुसरा क्रमांक कुमारी वेदिका रमेश मेंगडे९६.२०% तिसरा क्रमांक कुमार अंकित राहुल बाणखिले ९५.४०%निकाल लागला आहे

यशस्वी विद्यार्थी आणि सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विष्णू काका हिंगे पाटील उपाध्यक्ष योगेश चव्हाण , कार्याध्यक्ष गणपतराव हिंगे, सचिव वसंतराव हिंगे, विश्वस्त शांताराम बापू हिंगे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बाळासाहेब टाव्हरे, अवसरी बुद्रुक सरपंच, उपसरपंच, शिक्षण प्रसारक मंडळ अवसरी बुद्रुक ,अवसरी बुद्रुक ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या