spot_img
spot_img
spot_img

आंबेगाव तालुक्यातील १० शिक्षकांना सीएसआर उपक्रमांतर्गत डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संबंधित (एमएस-एसीआयटी) मोफत आधुनिक संगणक प्रशिक्षण

 

मंचर प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील १० शिक्षकांना सीएसआर उपक्रमांतर्गत सॉफ्ट टेक कंप्यूटर्स (मंचर) या अधिकृत शिक्षण केंद्रामार्फत डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संबंधित (एमएस-एसीआयटी) आधुनिक संगणक प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती सॉफ्ट टेक कंप्यूटर्सच्या संचालिका मयुरी पुष्पक शिंदे यांनी दिली.

सॉफ्ट टेक कंप्यूटर्स या अधिकृत शिक्षण केंद्रामार्फत सीएसआर उपक्रमांतर्गत ग्लोबंट इंडिया प्रा. लि. यांच्या सहकार्याने, आय आय एम व्ही व एम के सीएल यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेला एमएस एसीआयटी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. या उपक्रमात तालुक्यातील एकूण १० शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. या प्रशिक्षणाव्दारे शिक्षकांनी डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संबंधित आधुनिक कौशल्ये आत्मसात केली.

सॉफ्ट टेक कंप्यूटर्स केंद्राच्या वतीने शिक्षकांना संगणकावर आधारित शिक्षण, डिजिटल टूल्सचा वापर, तसेच एआय चा अध्यापनामध्ये प्रभावी उपयोग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीत सकारात्मक बदल होत असून विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे शक्य होत आहे.

या उपक्रमादरम्यान शिक्षकांचा उत्साह व प्रतिसाद अत्यंत समाधानकारक होता. कोर्स पूर्ण केल्यानंतर शिक्षकांनी या प्रशिक्षणामुळे त्यांच्या व्यावसायिक विकासाला मोठी चालना मिळाल्याचे मत व्यक्त केले.सॉफ्ट टेक कंप्यूटर्स केंद्राला हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान वाटत असून भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा आमचा प्रयत्न राहील असे मयुरी शिंदे यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या