मंचर प्रतिनिधी
शिरदाळे ( ता. आंबेगाव ) येथील ज्येष्ठ नागरिक व तरुणांनी एकत्र येत श्रमदारातून वट वृक्षाला ओटा बनवला आहे विशेष म्हणजे एका दिवसात हे काम पूर्ण केले आहे
गावाच्या तळ्याच्या कडेला दोन ते तीन वर्षांपूर्वी काही वडाचे झाड लावण्यात आले होते. तरुणांनी चांगल्याप्रकारे पाणी देऊन हे झाडे जगवले आहे.
अनेक दिवस ग्रामस्थांची त्याला ओटा बनवण्याची इच्छा होती.कारण आता उन्हाळा असल्याने त्याची चांगली सावली सर्वांना मिळणार आहे.
तरूणांनी जेष्ठ नागरिकांकडे ओटा बांधण्याची इच्छा व्यक्त केली मांडला. ज्येष्ठांनी सकारात्मक प्रतिसाद देत
तरुण जेष्ठ एकत्रित येत एका दिवसात ओट्याचे काम पूर्ण झाले
या स्तुत्य उपक्रमात जेष्ठ मंडळींचा सहभाग मोठा होता.कारण हेच काम करण्यासाठी कारागीर मंडळींनी हजारो रुपये घेतले असते.परंतु सर्वांच्या एकत्रित श्रमदानाने मात्र आज काम पूर्णत्वास गेले.
सर्वांना वटवृक्षाच्या झाडाच्या सावलीला बसण्याचा आनंद मिळणार आहे.या स्तुत्य उपक्रमामुळे या जेष्ठ व्यक्तिमत्वाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.





