spot_img
spot_img
spot_img

पोंदेवाडीत ट्रांसफार्मर चोरीला

 

मंचर प्रतिनिधी 
पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) येथील पोखरकरवस्ती जवळील महावितरण कंपनीचा ट्रांसफार्मर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डीपी स्ट्रक्चर वरून खाली पाडली व ती फोडण्यात आली
या घटनेमुळे पोखरकर वस्ती व वाळुंज वस्ती येथील तीस ते पस्तीस घरे अंधारात आहे महावितरण कंपनीने तात्काळ दुसरा ट्रांसफार्मर बसवावा व पोलीस प्रशासनाने अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, पोंदेवाडीचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे
घटनास्थळी महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली आहे
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात डीपी ( ट्रांसफार्मर ) चोरी करणारी टोळी सक्रिय असण्याची शक्यता नाकारता येत नाही

याबाबत निरगुडसर येथील महावितरण कंपनीचे सहायक अभियंता नितेश भासरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की यापूर्वी भराडी २, जारकरवाडी १, चांडोह १, आणि आता पोंदेवाडी १ अशी आज्ञात चोरट्यांनी ट्रांसफार्मरची चोरी केली आहे या सर्व घटनेची फिर्याद पोलीस स्टेशनला दिलेली आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असून शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्यासाठी व घरात वीजेची गरज भासत आहे तसेच या परिसरात बिबट्यांचे वास्तव्य आहे
ट्रांसफार्मर चोरीमुळे शेतकऱ्यांचा नुकसान होत आहे पोंदेवाडी येथे तात्काळ ट्रांसफार्मर बसविणार असल्याचे सहाय्यक अभियंता भासरकर यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या