spot_img
spot_img
spot_img

पहाडदरा येथे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन

 

मंचर प्रतिनिधी 

पहाडदरा येथे अखंड हरीनाम सप्ताहाचे ( दि. १८ मार्च) ते ( २५ मार्च ) पर्यंत आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे

सकाळी पहाटे चार ते सहा काकडा आरती, सकाळी सारे दहा वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी दोन ते तीन भजन, सायंकाळी साडेचार ते साडेपाच प्रवचन, साडेसहा वाजता हरिपाठ, रात्री सात ते नऊ हरि कीर्तन रात्री दहानंतर जागर होणार आहे

सप्ताह कालावधीत श्री नाथा महाराज गव्हाणे, सिद्धेश महाराज गार्डी, विष्णू महाराज केंद्रे, नामदेव महाराज वाळके, आदिनाथ महाराज जुन्नरकर, तानाजी महाराज तांबे, उत्तरेश्वर महाराज जाधव यांची हरी कीर्तने होणार आहे

तर पांडुरंग महाराज वीर, फकीरा महाराज पिंगळे, दत्ता महाराज ढेरंगे, बाळासाहेब महाराज विधाटे, कुसुमताई वाळुंज, भास्कर महाराज भोसले, लक्ष्मण महाराज वाळुंज यांची प्रवचने होणार आहे

तर काल्याच्या दिवशी विकास महाराज निसाळ यांच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे
पहाडदरा परिसरातील नागरिकांनी या नामयज्ञ सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पहाडदरा ग्रामस्थांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या