मंचर : आंबेगाव तालुक्यात सध्या गहू मळणीला वेग आला आहे. बहुतेक शेतकरी गहू मळणीसाठी हार्वेस्टरला पसंती देत आहेत.
पंजाब, हरियाना भागातून हार्वेस्टरचालक महाराष्ट्रात गहू मळणीसाठी दाखल झाले आहेत. मोठ्या हार्वेस्टरमुळे गहू कापणी, गोळा करणे व नंतर लहान हार्वेस्टरचे मळणी, असा वेळ व खर्च वाचत आहे. शिवाय, पैसेही कमी लागत आहेत. एकरी साडेतीन ते चार हजार रुपये दर हार्वेस्टरचालक गहू मळणीसाठी घेत असल्याचे पारगाव कारखाना येथील गहू उत्पादक सागर अर्जुन लोखंडे यांनी सांगितले.
एका तासात तीन ते चार एकरातील गव्हाची मळणी व्यवस्थितपणे हार्वेस्टरच्या मदतीने करता येत आहे. सध्या मजूर उपलब्ध होत नाहीत. मजुरांकडून गहू कापणी, गोळा करणे व नंतर मळणी यासाठी मजुरही वेळेत उपलब्ध मजुरांकडून गहू कापणी गोळा करणे व नंतर मळणी यासाठी मजूर वेळेत उपलब्ध होत नाही त्यात मोठ्या
हार्वेस्टरच्या तुलनेत अधिकचा खर्चही येत आहे. एकरी अडीच हजार ते तीन हजार रुपये खर्च मजुरांकडून गहू कापणी, गोळा करणे यासाठी लागत आहे. ट्रॅक्टरचलित यंत्रणेद्वारे गहू मळणीसाठी प्रतिक्विंटल साडे तीन हजार रुपये खर्च लागत आहे. पंजाब, हरियाना भागातील
हार्वेस्टरने गहू मळणीचे अधिक काम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मिळत आहे. ही मंडळी विविध भागातील अग्रभागी असलेल्या पेट्रोल पंप, ढाबे, शेतांमध्ये मुक्कामी राहत आहेत. मुख्य रस्त्यानजीक त्यांचे वास्तव्य असते. शेतकऱ्यांशी सहज संपर्क व्हावा, यासाठी ही मंडळी मुख्य रस्त्यांनजीकच्या पेट्रोल पंपांसह शेतांमध्ये आपले वास्तव्य करीत आहे.
सध्या आंबेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात गहू मळणीची लगबग सुरू आहे, शेतकरी मजुरी पेक्षा हार्वेस्टरला गहू मळणीला पसंती देत आहे एकरी साडेतीन ते चार हजार रुपये घेतले जातात
सागर लोंखडे गहू उत्पादक पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव.





