मंचर प्रतिनिधी
शासन निर्णयाची अंमलबजावणी करून ग्रामरोजगार सहाय्यकांना मानधन द्या अशी मागणी आंबेगाव तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेने आंबेगाव तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती कार्यालय आंबेगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
ग्राम रोजगार सहायकांना मानधन मिळण्याबाबत दि. 3/10/2024 रोजी शासन निर्णय झाला असून दरमहा 8000/- रूपये मानधन देण्याचे निश्चित केले आहे
सदर निवेदनात म्हटले आहे की,
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार सहाय्यकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यानुसार मागील अनेक वर्षांपासून ग्रामरोजगार सहाय्यक प्रामाणिकपणे सर्व कामे करत आहे. परंतु कामाच्या अनुषंगाने त्यांना अत्यल्प मानधन मिळत आहे.
शासन निर्णयानुसार मानधन वितरणाची अद्याप कोणतीच कार्यवाही न झाल्याने ग्रामरोजगार सहाय्यक यांना शासन निर्णयानुसार मानधन जमा झालेले नाही. त्यामुळे ग्रामरोजगार सहाय्यक यांना उपासमारीची वेळ निर्माण झालेली आहे. त्यामुळे शासन निर्णयाची अंमलबजावणी होवून सर्व ग्रामरोजगार सहाय्यकांना मानधन मिळावा अशी मागणी
ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेने केली आहे.





