spot_img
spot_img
spot_img

हवेलीच्या हेमलता बडेकरांकडे महाराष्ट्रातील महिला दुकानदार संघटनेची धुरा ! ३५ वर्षांच्या जनसेवेची दखल;

 

मंचर प्रतिनिधी

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील सामाजिक कार्यकर्त्या व गेल्या ३५ वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानदार म्हणून कार्यरत असलेल्या हेमलता बडेकर यांची अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या राज्य महिला आघाडीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

उरुळी कांचन ( ता. हावेली ) येथे रेशनिंग दुकानदार संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली यावेळी त्यांना सदर नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी ऑल इंडिया रेशन फेडरेशनचे अध्यक्ष पुष्कराज काका देशमुख, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डी एन पाटील, उपाध्यक्ष राजेश आंबुसकर, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत यादव, सचिव विजय पंडित, कोषाध्यक्ष प्रभाकर पाडळे आंबेगाव तालुका रेशनिंग संघटनेचे अध्यक्ष सुरेश घोलप शिरूर चे अध्यक्ष गणेश रत्नपारखी यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे अध्यक्ष व रेशनिंग दुकानदार यावेळी उपस्थित होते.

त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत राज्य संघटनेने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

हेमलता बडेकर यांनी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सर्वसामान्य नागरिकांशी थेट संपर्क ठेवत काम केले आहे. सन २०१७ मध्ये पंचायत समिती निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी सांभाळली. या कार्यकाळात महिला सक्षमीकरण, महिला बचत गटांचे मेळावे, डीबीटी योजना तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला.

कोरोना महामारीच्या कठीण काळात तसेच पूरग्रस्त भागात त्यांनी कार्यतत्परतेने मदत पोहोचवून सामाजिक बांधिलकी जपली. हवेली तालुक्यात त्यांच्या सामाजिक कार्याची स्वतंत्र ओळख निर्माण झाली असून, विविध शासकीय व सामाजिक कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांची त्यांच्याकडे सातत्याने वर्दळ असते.
सध्या त्या पुणे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रश्नांसाठी संघटनात्मक पातळीवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्य संघटनेने त्यांची राज्य महिला आघाडीच्या प्रमुखपदी निवड केली आहे.

हेमलता बडेकर या पुणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर यांच्या मातोश्री आहेत. त्यांच्या निवडीचे हवेली तालुक्यासह जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून स्वागत करण्यात येत आहे.

चौकट

“दुकानदारांना केवळ वितरणाचे माध्यम न समजता त्यांना योग्य मोबदला आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे तसेच महिला बचत गटांच्या दुकानदारांच्या अडचणी समजावून घेऊन त्या अडचणी सोडवणार आहे
यासोबत कमिशनमध्ये वाढ, थकीत कमिशनची वेळेवर देयके, ई-पॉसची कायमस्वरूपी तांत्रिक व्यवस्था, खराब धान्याची जबाबदारी पुरवठा यंत्रणेवर निश्चित करणे, दुकानाचे भाडे/वीज खर्चासाठी मदत आणि दुकानदारांना विमा व पेन्शनची सुविधा हे प्रमुख मागणी करणार आहे

हेमलता बडेकर – अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन महासंघ राज्य महिला आघाडी प्रमुख.

Related Articles

ताज्या बातम्या