जारकरवाडी पारगाव जिल्हा परिषद गटात घड्याळाची सरशी, भाजपचा दारूण पराभव तुतारीला एक जागा
मंचर
जारकरवाडी पारगाव जिल्हा परिषद गटात घड्याळाची सरशी झाली आहे आमदार दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी या जिल्हा परिषद गटातुन निवडणूक लढवत होते आमदार दिलीप वळसे पाटील यांचा गाव असलेले निरगुडसर हे गाव या जिल्हा परिषद गटात येत असल्याने तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते आमदार दिलीप वळसे पाटील आजारी कारणास्तव प्रचारात आले नाही जारकरवाडी पारगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व विवेक वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील यांनी योग्य नियोजन करून विजय मिळवला आहे
पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातुन घड्याळाचे विवेक वळसे पाटील व जारकरवाडी पंचायत समिती गणातुन अंकिता वाळुंज हे विजयी झाले तर पारगाव पंचायत समिती गणातुन तुतारीच्या श्वेता ढोबळे या विजयी झाले आहेत
उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे
जारकरवाडी पारगाव जिल्हा परिषद गट
अरुण गिरे – 11002
विवेक वळसे पाटील – 13809
किरण वाळुंज – 1148
गणेश काकडे – 112
जारकरवाडी पंचायत समिती गण
शैला भोजने – 734
अंकिता वाळुंज – 6746
रोहीणी दिलीप वाळुंज – 6198
रोहीणी प्रशांत वाळुंज – 225
पारगाव पंचायत समिती गण
सुनंदा निवृत्ती ढोबळे – 5629
श्वेता किरण ढोबळे – 6170
मुक्ता तानाजी लबडे – 271
या प्रमाणे मते मिळाली आहे
चौकट
निवडणूक संपली आहे राजकारणापेक्षा समाज करणाला महत्त्व देणार आहे कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत मतदारांनी दिलेला पाठिंबा पक्षाने दाखवलेला विश्वास यामुळे हे सर्व शक्य झाले आहे विजयाचा आनंद होत आहे परंतु उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाने या विजयाला दुःखाची झालर आहे मिरवणुका किंवा आनंदात्सव साजरा करणार नाही तशा सुचना आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. मिळालेला विजय कार्यकर्त्यांना मतदारांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना समर्पित करतो
विवेक वळसे पाटील – जारकरवाडी पारगाव जिल्हा परिषद गटाचे विजयी उमेदवार





