Home राजकीय अंकिता वाळुंज यांची वयाच्या बावीसाव्या वर्षी पंचायत समिती सदस्य पदी निवड

अंकिता वाळुंज यांची वयाच्या बावीसाव्या वर्षी पंचायत समिती सदस्य पदी निवड

0


अंकिता वाळुंज यांची वयाच्या बावीसाव्या वर्षी पंचायत समिती सदस्य पदी निवड

मंचर

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडून या निवडणुकांचे मतमोजणी होऊन निकाल घोषित झाले.यामध्ये आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आले असून वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

*पुणे जिल्हा परिषद व आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुका अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पार पडल्या या निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात सर्वपक्षीय आघाडी असा सामना रंगला होता.यावेळी सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. घोडेगाव,पेठ,बोरघर,शिनोली,अवसरी, पिंपळगाव, पारगाव,जारकरवाडी, कळंब ,रांजणी या जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये मोठ्या प्रमाणात लढती चुरशीच्या झाल्या.यामध्ये जारकरवाडी पंचायत समिती गणातून कुमारी अंकिता अनिल वाळुंज विजयी झाल्या आहेत. निवडणूक साठी पात्रता ही 21 वर्षाची आहे अंकिता वाळूंज या वयाच्या 22 व्या वर्षी पंचायत समितीमध्ये निवडून आल्या आहेत.

त्यांचे शिक्षण बी फार्मसी झाले असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडील अनिल वाळूंज यांचा राजकीय वारसा चालवत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.माघील चार ते पाच महिन्यापासून पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधी गावोगावी घरोघरी जाऊन त्यांनी जनसंपर्क वाढवला व या जोरावर त्या कमी वयामध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून आंबेगाव तालुक्यातून निवडून आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here