निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील उदयोन्मुख क्रिकेटपटू प्रतिक ज्ञानेश्वर कडलक याची १९ वर्षाखालील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा क्रिकेट खेळासाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
रत्नागिरी येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणीमध्ये संपूर्ण राज्यातून १९ वर्षाखालील खेळाडू सहभागी झाले होते. त्यातून प्रतिकची निवड झाली आहे.
दि.११ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान मध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिक हा महाराष्ट्र संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळणार आहे.
या अगोदर देखील प्रतिक याने वयोगट-१४ आणि वयोगट-१६ महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
त्याच्या या निवडीबद्दल माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रतिक हा राजमाता ज्युनिअर कॉलेज, लांडेवाडी (भोसरी) येथील विद्यार्थी असून त्याच्या निवडीमुळे निरगुडसर व आंबेगाव तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. आहे. त्याच्या या निवडीमुळे आंबेगाव तालुक्यातील क्रिकेट प्रेमीनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे