spot_img
spot_img
spot_img

निवृत्ती आदक यांची राज्यकर उपायुक्तपदी पदोन्नती

 

मंचर प्रतिनिधी 
लोणी (ता. आंबेगाव) येथील निवृत्ती तुकाराम आदक यांची वस्तू व सेवा कर (GST) विभागातील राज्यकर सहाय्यक आयुक्त पदावरून राज्यकर उपायुक्त पदावर पदोन्नती झाली आहे.

निवृत्ती आदक यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागात विक्रीकर निरीक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली होती. आपल्या कर्तृत्व, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेच्या बळावर त्यांनी प्रशासनात उल्लेखनीय कामगिरी करत ही पदोन्नती मिळवली आहे.

शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत असतानाही त्यांनी आपल्या गावाशी असलेली नाळ कायम जपली आहे. लोणी गावातील सामाजिक, शैक्षणिक व विविध विकासात्मक उपक्रमांमध्ये ते तन, मन आणि धनाने सहभागी होत असतात. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदराची भावना आहे.

आदक त्यांच्या राज्यकर उपायुक्तपदी झालेल्या पदोन्नतीबद्दल लोणी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या