Home क्राईम लोणीत भरदिवसा महिलेला लुटण्याचा प्रयत्न फसला

लोणीत भरदिवसा महिलेला लुटण्याचा प्रयत्न फसला

0
लोणीत भरदिवसा महिलेला लुटण्याचा प्रयत्न फसला

मंचर  प्रतिनिधी

लोणी ( ता.आंबेगाव ) येथील बेल्हा-जेजुरी महामार्गावर लोणी पाबळ लगत असताना असणाऱ्या दुकानात बसलेल्या विजया ज्ञानेश्वर गायकवाड (वय-५५वर्ष)या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचा सोन्याचा गंठण हिसकावण्याचा प्रयत्न मोटर सायकल वरून आलेल्या चोरट्याने केला. बुधवार( दि.१३ रोजी) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मोटर सायकल वरून आलेल्या दोन चोरट्यांनी तंबाखूची पुडी घेण्याच्या बहाना करून दुकानाजवळ येऊन गंठण ओढण्याचा प्रयत्न केला असता सदर महिलेने जोरदार प्रतिकार केल्याने चोरटा मोटर सायकल वरून पळून गेला. सदर दुसरा चोरटा गाडीवर बसून गाडी सुरु करून होता. आरडा ओरडा होताच चोरटे पळून गेले.

दुकानदार महिलेने चोरट्याची शर्टची कॉलर धरून जोरदार प्रतिकार केल्यामुळे दागिना तिथेच टाकून चोरटे पाबळच्या दिशेने पळून गेले.चार साडेचार लाख रुपयांची चोरी होता होता वाचली.सदर घटनेची माहिती कळताच त्वरीत घटनास्थळी पारगाव-कारखाना पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार दत्ता जठर व पोलीस अंमलदार संजय साळवे,पोलीस पाटील संदीप आढाव यांनी भेट देऊन परिस्थिती पाहणी केली. एकांत घर असणाऱ्या नागरिकांनी फेरीवाल्या लोकांपासून सावध राहावे असे आवाहन पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here