मंचर प्रतिनिधी
पारगाव (ता.आंबेगाव) येथील
पारगाव भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या पुर्व बाजूलाच संतोष बबन ढोबळे यांच्या शेतात मेंढपाळ वास्तव्यास होते. रात्रीच्या सुमारास बापू शिंदे तसेच बबन शिंदे मेंढपाळ यांच्या दीड वर्षाच्या घोडीवर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात घोडी जागीच मृत पावली आहे यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या कुटुंबाला नुकसान भरपाईची मागणी माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे यांनी केली आहे.
मोरगाव सुपा (बारामती) येथील बापू शिंदे आणि बबन शिंदे हे दोघे बंधू असून हे गेल्या अनेक वर्षांपासून पारगाव कारखाना परिसरात मेंढपाळसाठी वास्तव्यास आहेत. सदरची घटना वनविभागाला समजताच वनविभागाने तत्परतेने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली व पंचनामा केला आहे
विठ्ठल ढोबळे सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे यांनी वनविभागाने त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे.





