मंचर प्रतिनिधी
जारकरवाडी, ता. आंबेगाव : राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय, जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) या विद्यालयाचा सन २०२५-२६ च्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ९४ टक्के लागला असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकला वाघमारे यांनी दिली विद्यालयाच्या यशाबद्दल जारकरवाडी परिसरातून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. परीक्षेत प्रथम पाच क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
१) सार्थक विजय भांड – ९२.२ टक्के
२) कु. अक्षदा बाळू वनवे – ९०.६ टक्के
३) सार्थक नामदेव भांड – ८७.६ टक्के
४) कु. दुर्गा पंढरीनाथ लबडे – ८५.२० टक्के
५) कु. सानिका संतोष लबडे – ८१.४० टक्के
६) कु. कार्तिकी बाळासाहेब भोजणे – ८१.२० टक्के
विद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे जारकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.





