मंचर प्रतिनिधी
धामणी ( ता. आंबेगाव ) येथील ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत सरपंचपदी राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) प्रतिक्षा राजेंद्र जाधव यांची थेट जनतेतून लोकनियुक्त सरपंच पदी निवड झाली आहे.

सरपंच रेश्मा अजित बोराडे यांनी लोकनियुक्त सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हि निवडणूक पार पडली
धामणीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी तिरंगी लढत झाली त्यामध्ये अर्चना दिपक जाधव, सविता राजेंद्र जाधव, प्रतिक्षा राजेंद्र जाधव हे उमेदवार लोकनियुक्त सरपंच पदासाठी निवडणूक लढवत होते. प्रतिक्षा राजेंद्र जाधव ह्या १५५ मतांनी लोकनियुक्त सरपंच पदासाठी निवडून आले आहेत
धामणी ग्रामपंचायतीत झालेल्या तिरंगी निवडणुकीत मतदारांनी अपेक्षेपेक्षा वेगळा कौल देत प्रतीक्षा राजेंद्र जाधव यांच विजय झाला आहे. या विजयामुळे धामणी गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली असल्याचे बोलले जात आहे
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार करण्यात आला होता. मात्र अंतिम निकालात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिक्षा राजेंद्र जाधव यांनी विजयाची बाजू मारली
उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे १) अर्चना दिपक जाधव – कपबशी ८५०,
२) जयश्री राजेंद्र जाधव – रिक्षा २७५
३) प्रतीक्षा राजेंद्र जाधव – कपाट १००५
याप्रमाणे मते मिळाली
प्रतिक्षा राजेंद्र जाधव यांची लोकनियुक्त सरपंच पदाची निवड होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी भंडाराची उधळण करत पेढे वाटून जल्लोष केला
नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच प्रतीक्षा राजेंद्र जाधव यांचा सत्कार मंचर येथे माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या संपर्क कार्यालयात अनुसया उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरणताई वळसे पाटील जि.प. उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व धामणीतील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
चौकट
मला मिळालेला विजय हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे हा विजय धामणीच्या म्हाळसाकांत खंडेराया व मतदारांच्या चरणी समर्पित करते मला निवडून आणण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले कार्यकर्त्यांची व मतदारांचे मी आभार मानते
माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आंबेगाव तालुका पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे
प्रतिक्षा राजेंद्र जाधव – नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच धामणी ता. आंबेगाव जिल्हा पुणे





