spot_img
spot_img
spot_img

पोंदेवाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

 

मंचर प्रतिनिधी

पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथे ग्रामपंचायत कार्यालय व समस्त ग्रामस्थांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या़ंची जयंती साजरी करण्यात आली

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मूलमंत्र आजही समाजाला दिशा देणारा ठरत आहे. भारताची सार्वभौम राज्यघटना बाबासाहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केली. या संविधानाच्या बळावरच देशातील सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळतो आणि देशाचा कारभार लोकशाही मार्गाने सुरळीतपणे चालतो.

तालुक्यासह जिल्ह्यात उत्साही वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे. यावेळी आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर, महेंद्र पोखरकर, निलेश मांजरे, अमोल वाळुंज, आनंदा पोंदे, चंदकांत विरकर व पोंदेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या