spot_img
spot_img
spot_img

पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

 

मंचर प्रतिनिधी
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला अवकाळीसह गारपिटीचा तडाखा बसला या अवकाळी सह गारपीटीचा फटका आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, खडकवाडी, पोंदेवाडी, लाखणगाव, देवगाव, जारकरवाडी, वडगावपीर, मांदळेवाडी आदी गावांना बसला
बुधवारी (दि. १) दुपारच्या सुमारास अवकाळी पावसासह गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
या अवकाळी पावसादरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि गारपीट झाली. काही तासांतच सर्वत्र पाणी साचले. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे तसेच गोठ्यांचे छत उडून गेले, त्यामुळे नागरिकांनाही मोठा फटका बसला आहे.


गारपिटीमुळे कांदा, गहू, हरभरा, मका, फळबागा तसेच जनावरांचा चारा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी काढून ठेवलेला कांदा शेतातच भिजला, तर उभी पिके आडवी झाली. काही तासांतच शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.


या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून महसूल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या