मंचर प्रतिनिधी
धामणी (ता.आंबेगाव ) येथील शेतकऱ्यांच्या जल सिंचन उपसा योजनेला वीजजोड देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानूसार पुणे येथील महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी सोमवार (दि.२३) रोजी जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) हद्दीतील ज्ञानेश्वरवस्ती येथे डिंबा धरणाऱ्या उजव्या कालव्यावर असणाऱ्या प्रकल्पाची प्रत्यक्ष पहाणी केली असून या पहाणीचा अहवाल मुख्यमंत्री यांना लवकरात लवकर सादर केला जाणार आहे.त्यामुळे या धामणी सिंचन योजनेमध्ये असणार्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
या पहाणीत महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल काकडे,अधिक्षक अभियंता युवराज जरग, मंचर येथील कार्यकारी अभियंता राहुल गवारी,उपकार्यकारी अभियंता पुनम पांडकर,लोणी येथील कनिष्ठ अभियंता हितेश गायकवाड,सहाय्यक अभियंता नितेश बसारकर आणि लाईनमन व योजनेतील सर्व शेतकरी उपस्थित होते अशी माहिती धामणी ग्रामपंचायत सदस्य प्रतीक जाधव यांनी दिली
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र करंजखेले, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, उद्योजक मंगेश नवले, वामनराव जाधव, कैलास रोडे, बाळासाहेब विधाटे,
या योजनेचा संबंधित शेतकरी यावेळी उपस्थित होते
धामणी हे दुष्काळग्रस्त गाव असून येथील शेतकर्यांनी कोट्यावधी रुपये खर्च करून उजव्या कालव्यावरून नऊ सामुदायिक उपसा सिंचन योजना सुरू केल्या आहेत.मात्र नवीन वीजजोड नसल्याने या योजना सौर प्रकल्पावर पूर्ण क्षमतेने चालत नाही .त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.या सिंचन योजनेला वीज जोड मिळावा यासाठी धामणी येथे ३०० शेतकरी ग्रामस्थांनी एक दिवसीय उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले होते. दरम्यान महावितरणचे मुख्य अभियंता
सुनिल काकडे यांनी येथे भेट देऊन येथे असलेल्या सोलर प्रकल्पाची पहाणी केली व दूर अंतरावर असलेल विहिरीवर जाऊन पहाणी केली.
आता या योजनेला नक्कीच वीजजोड मिळेल अशी आशा येथील शेतकर्यांनी व्यक्त केली.व आपण आपल्या हक्काच्या पाण्यासाठी दिलेल्या लढ्याला यश येणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांची धामणी ग्रामस्थांनी भेट घेतली होती वळसे पाटील यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सूचना देत घटनास्थळाला भेट देण्यास सांगितले होते संबंधित प्रशासनाने वळसे पाटील यांच्या सूचनेची दखल घेत पहाणी सुरू केली आहे
रवींद्र करंजखेले – माजी पंचायत समिती सदस्य आंबेगाव





