
मंचर प्रतिनिधी
जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथील ग्रामदैवत आई वडजादेवी यात्रोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकार दिली आहे
बुधवार ( दि. २५ ) रोजी सकाळी सात ते आठ देवीस हारतुरे व मांडव डहाळे सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बैलगाड्यांच्या भव्य शर्यती रात्री नऊ ते अकरा छबिना व पालखी मिरवणूक रात्री अकरा नंतर विठ्ठल कृपा कला नाट्य मंडळ यांचा भजनी भारुडाचा कार्यक्रम होईल गुरुवार ( दि. २६ ) रोजी सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत बैलगाड्यांच्या भव्य शर्यती सायंकाळी पाच ते सात शेरणी वाटप रात्री नऊ नंतर रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे बैलगाडा शर्यतीसाठी एकूण इनाम २,९७,५०१ असून यावेळी घोड्यांच्या शर्यती संपन्न होणार आहे





