
मंचर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती काठापूर बुद्रुक येथे शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात आली.यावेळी किल्ले शिवनेरीवरून आणलेल्या शिवज्योतीची मिरवणूक गावातून काढण्यात आली.
काठापुर बुद्रुक ( तालुका आंबेगाव ) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात येते. याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी किल्ले शिवनेरी ते काठापुर बुद्रुक शिवज्योत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व शिवज्योतीची गावातुन मिरवणूक काढण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत थोरात,पोलीस पाटील अमोल करंडे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सागर शेटे, श्वेता करंडे,मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, संतोष करंडे, एकनाथ ढमाले, योगेश करंडे, बजरंग करंडे,मयुर जाधव, समीर करंडे, कैलास टिंगरे,ओंकार पवार, विनायक नरे, अविनाश भागवत त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.





