
लोणी धामणी ( प्राध्यापक अरुण गोरडे )
आंबेगाव तालुक्यातील अवसरी फाटा ते निरगुडसर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वरील रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणासाठी अवसरी बुद्रुक निरगुडसर रस्ता खोदून ठेवला आहे हे काम कासव गतीने सुरू असून वाहन चालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याचे कामाकडे ना ठेकेदार लक्ष देत आहे ना अधिकारी लक्ष देत नाही.
अवसरी बुद्रुक ते मेंगडेवाडी निरगुडसर रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले असून याबाबत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संबंधित ठेकेदार व प्रशासकीय अधिकारी याची बैठक घेऊन तातडीने सिमेंट रस्त्याचे काम चालू करण्याचे आदेश द्यावेत तसेच अवसरी फाटा ते अवसरी बुद्रुक रस्त्यावर पडलेले खड्डे तात्पुरत्या स्वरूपात डाबर टाकून बुजवावेत अशी मागणी वाहन चालक करत आहे.
माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अवसरी फाटा ते निरगुडसर पारगाव मार्गे जांबुत शिक्रापूर या रस्त्याच्या रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटी करण्यासाठी ४१८ कोटींहून अधिक निधी एक वर्षांपूर्वी मंजूर केला त्यानंतर आता सहा महिन्यापासून संबंधित ठेकेदारांनी अवसरी खुर्द ते निरगुडसर रस्त्यावरील छोट्या पुलांची कामे पूर्ण करून अवसरी बुद्रूक ते निरगुडसर रुंदीकरण कामाला सुरुवात केली आहे.
सदर काम सहा महिन्यापासून संथ गतीने सुरू असून अवसरी बुद्रुक ही हिंगेवस्ती, मेंगडेवाडी, निरगुडसर रस्ता जागोजागी खोदून ठेवला आहे काही ठिकाणी सिमेंट रस्त्याचे एक बाजूने काम चालू आहे परंतु रस्त्याचे रुंदीकरण करत असताना ठेकेदारांनी रस्त्यावर कोठेही पाणी मारले नसल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याचा मोठा त्रास दुचाकी चालकांना होत आहे रस्त्याला ये जा करणाऱ्या वाहचालक प्रवाशांना धुळीमुळे त्रास सहन करावा लागत असून अनेकांना श्वसनाचे डोळ्याचे आजार होत आहेत रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या नागरिकांना देखील मोठ्या त्रास सहन करावा लागत आहे.
४१८ कोटी रुपयांचे रस्त्याचे काम चालू असताना ठेकेदार कधीच रस्त्याच्या कामाकडे येऊन पाहत नाही रस्त्याचे सर्व कामे इंजिनिअर पाहत असून हे सर्व ठेकेदार इंग्रजी किंवा हिंदीत बोलत असल्याने इंजिनियर वाहन चालकांना जुमानत नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदार व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी वाहन चालक करत आहे.





