spot_img
spot_img
spot_img

शिरदाळे येथे महाशिवरात्री निमित्त ग्रामस्वच्छता अभियान

लोणी धामणी ( प्राध्यापक अरुण गोरडे )

शिरदाळे (ता.आंबेगाव ) येथे रविवार (दि.१५) रोजी महाशिवरात्री निमित्त ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी गावातील सर्व तरुण मंडळी तळ्यावरील व महादेव मंदिराच्या परिसरात जमले होते.

 

शिवरात्री असल्याने महादेवासमोर महाप्रसादाचा कार्यक्रम होता.सर्व तरुणांनी महाप्रसाद घेतल्यावर एक नेक काम करण्याचे ठरवले तसेच आपण आपल्या गावचे नागरिक तसेच भविष्य या नात्याने तळ्याच्या कडेला पडलेला कचरा,रस्त्याच्या कडेला पडलेल्या बॉटल,इतर प्लास्टिक कचरा साफ करण्याचे ठरवले आणि बघता बघता सर्व परिसर एक तासात स्वच्छ करून घेतला.

 

त्यामुळे तरुणांनी केलेल्या या सुंदर उपक्रमाचे ग्रामस्थ कौतुक करत आहेत. तळ्याच्या लगत रोज महिला कपडे धुण्यासाठी तसेच भांडी धुण्यासाठी,जनावरे पाणी पिण्यासाठी येत असतात.तळ्याच्या लगतचा कचरा हा तसाच त्या पाण्यात जात असतो तेच पाणी आपल्याला वापरण्यासाठी येत असते.

 

त्यामुळे या तरुणांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे.महिन्यातून एक दिवस तरी असा कचरा साफ केला तरी गावचा मुख्य परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल.या स्तुत्य उपक्रमात जगदीश रणपिसे,संकेत तांबे,सोमनाथ तांबे,महेश चौधरी,राज तांबे,श्रीनाथ तांबे,हृतिक सरडे,पूजा सरडे व गावातील यूवकांनी उत्सूपूर्तपणे सहभाग नोंदवला अशी माहिती माजी सरपंच मयूर सरडे यांनी दिली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या