मंचर
जारकरवाडी ( ता. आंबेगाव जिल्हा पुणे) येथील ज्ञानेश्वरवस्ती येथे भागवत कथेचे आयोजन केल्याची माहिती ज्ञानेश्वरवस्ती जारकरवाडी ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
दि. ९ जानेवारी ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत डॉ विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या अमृत वाणीतून संपन्न होणार आहे शुक्रवार ( दि. ९ ) रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत श्रीमद भागवत ग्रंथाची मिरवणूक होणार आहे.
भागवत कथेच्या कालावधीत सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ, सायंकाळी सहा ते नऊ भागवत कथा, रात्री नऊ नंतर महाप्रसाद तद्नंतर कथा साथ संगत श्री वारकरी परिवार असा कार्यक्रम संपन्न होणार आहे पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांनी केले आहे.





