spot_img
spot_img
spot_img

पूर्व आंबेगावात पावसाची हजेरी; चारा-पाणी प्रश्न कायम निरगुडसर, मेंगडेवाडी, जारकरवाडी, लोणी परिसरात हलक्या सरी; दमदार पावसाची प्रतीक्षा

 

मंचर प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिरायती भागात शेतीच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत रविवारी (दि. २०) पूर्व आंबेगावातील निरगुडसर, मेंगडेवाडी, जारकरवाडी व लोणी परिसरात पावसाने हजेरी लावली. मात्र, हा पाऊस अल्पकाळ पडल्याने शेतीच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अद्याप कायम आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी खरीप पिके आणि चारा पिके अडचणीत आली आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना रविवारी झालेल्या हलक्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

वेळोवेळी पाऊस झाल्यास शेतीला दिलासा
पूर्व भागात वेळोवेळी चांगला पाऊस झाल्यास शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. सध्याच्या हलक्या पावसाने हा प्रश्न सुटणार नसून, पावसाची सातत्यपूर्ण हजेरी आवश्यक आहे, असे लोणी येथील व्यापारी जयेश वाळुंज यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या