मंचर प्रतिनिधी
श्री म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिर धामणी (तालुकाआंबेगाव )येथील महाद्बारासमोर लोकसहभागातून नवीन दगडी दीपमाळ बांधण्याचे कामासाठी सोनेवाडी बुद्रुक (तालुका निफाड. जिल्हा नाशिक )येथील * समस्त सोनेवाङीच्या ग्रामस्थांनी बैठक घेऊन सोनेवाडी बुद्रुक गावाच्या वतीने सहकार्य करण्याचे ठरवण्यात आले. या सर्व ग्रामस्थांनी दोन दिवसात रूपये ११९६१६/ (रूपये एक लाख एकोणीस हजार सहाशे सोळा फक्त) ची स्वेच्छेने एकञित देणगी जमा केली. मंगळवारी (१५ सप्टेंबर २६) सोनेवाडी बुद्रूक येथून ४० हून अधिक ग्रामस्थ खंडोबा देवस्थान मंदिर धामणी येथे येऊन कुलस्वामी खंडेरायाचे दर्शन घेऊन “सदानंदाचा येळकोट “चा जयघोष भंडारा उधळून रुपये ११९६१६/ त्यांनी देवस्थानाचे सेवेकरी व ग्रामस्थ मंडळीच्या स्वाधीन केली.
यावेळी प्रविण अशोक पडोळ पाटील. योगेश पडोळ . भाऊराव पडोळ . उत्तम पडोळ . प्रविण भाऊराव पडोळ . नंदू पडोळ . नारायण पडोळ . सिताराम आहेर .रामदास पडोळ . सुनिल पडोळ . जनार्दन पडोळ. अनिल पडोळ . राजू पडोळ . ईश्वर पडोळ . रमेश पडोळ . संदीप पडोळ.व समस्त पडोळ मंडळीचा देवस्थानाच्या वतीने पहाडद-याचे सरपंच मच्छिद्र वाघ. दादाभाऊ भगत. सुभाष तांबे. दगडू करंजखेले. माऊली बो-हाडे यांनी मानाची टोपी शाल व श्रीफळ प्रदान करून देणगीदाराचा सत्कार करण्यात आला.





