मंचर प्रतिनिधी
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाने संघटन विस्ताराला मोठी गती दिली असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पक्षाच्या विविध पदांवर संधी देत गावपातळीवर संघटना मजबूत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. विशेषतः आंबेगावच्या पूर्व भागात भाजप पूर्व मंडळाचे अध्यक्ष किरण वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली गावागावांत पक्षाची ध्येयधोरणे आणि विचार पोहोचविण्याचे काम जोमाने सुरू आहे.
अध्यक्ष किरण वाळुंज हे सातत्याने पूर्व भागातील विविध गावांना भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे आणि बूथस्तरावरील संघटना सक्षम करणे यावर विशेष भर दिला जात आहे.
यावेळी पूर्व मंडळाचे सरचिटणीस, उपाध्यक्ष, सचिव, युवा मोर्चाचे पदाधिकारी, महिला मोर्चाच्या पदाधिकारी, बूथ प्रमुख तसेच गावागावांतील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत असून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत.
किरण वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या संघटनात्मक मोहिमेमुळे पूर्व आंबेगावातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद अधिक वाढेल, असा विश्वास पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.





