spot_img
spot_img
spot_img

जारकरवाडी गणातील गावांच्या विकासासाठी पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांचा दौरा, ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी प्रयत्नशील

 

मंचर प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी पंचायत समिती गणाच्या सदस्या अंकिता वाळुंज यांनी आपल्या गणातील विविध गावांना भेटी देत ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. गावागावांतील मूलभूत सुविधा, शासकीय कार्यालयांची स्थिती तसेच नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

याच अनुषंगाने त्यांनी पहाडदरा येथील ठाकरवाडीला भेट दिली. या भेटीदरम्यान परिसरात वीज, रस्ते, आरोग्य सेवा तसेच इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक त्या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.

यावेळी बोलताना अंकिता वाळुंज म्हणाल्या की, जारकरवाडी पंचायत समिती गणातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.
याशिवाय त्यांनी गणातील सर्व ग्रामपंचायत कार्यालये, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्रे तसेच अंगणवाड्यांना भेटी देण्यास सुरुवात केली असून, या ठिकाणी असलेल्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी आवश्यक ती मदत व पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

अंकिता वाळुंज यांच्या या दौऱ्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, स्थानिक पातळीवरील प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या