spot_img
spot_img
spot_img

खडकी येथील जिल्हा परिषद शाळेला आरओ वॉटर फिल्टरची भेट

 

मंचर प्रतिनिधी
खडकी ( ता . आंबेगाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महादेव पांढरी वस्ती येथील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने शाळेला आरओ वॉटर फिल्टर भेट देण्यात आला.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नितीन राक्षे यांनी शाळेसाठी आरओ फिल्टरची आवश्यकता असल्याचे सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आंबेगाव तालुकाध्यक्ष विशाल वाबळे व सचिन हगवणे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून पालक व ग्रामस्थांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नितीन राक्षे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आंबेगाव तालुकाध्यक्ष विशाल वाबळे, सचिन हगवणे, राजू बांगर, अनिल पोखरकर, शांताराम माळवदे, पल्लवी वाबळे, प्रांजल हगवणे, किरण पोखरकर, विकास निघोट तसेच शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

मुख्याध्यापक श्री. चिखले सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून विद्यार्थ्यांच्या हितासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

Related Articles

ताज्या बातम्या