spot_img
spot_img
spot_img

जारकरवाडी लोणी रस्त्यालगत धोकादायक विहीरीला बसवले तारेचे कंपाऊंड

 

मंचर प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी लोणी रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहीरीला तारेचे  कंपाऊंड बसवले आहे
संघर्षनामा न्युजने  काही  दिवसांपूर्वी धोकादायक विहीरीबाबत बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.
या बातमीची दखल घेत पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी संबंधित विहिरीची प्रत्यक्ष पाहणी केली.

त्यानंतर सदर धोकादायक विहीरीभोवती तातडीने तारेचे कंपाऊंड बसविण्यात आले आहे. विहिरीला संरक्षणात्मक कंपाऊंड बसवल्यामुळे भविष्यात होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टळण्यास मदत होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

सदर काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्याबद्दल जारकरवाडी ग्रामस्थांनी पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांचे आभार मानले आहेत.

चौकट
पारगाव कारखाना पोलीस स्टेशन हद्दीत आतापर्यंत वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यालगत दोन विहीरींना संरक्षणात्मक तारेचे कंपाऊंड बसवण्यात आले आहे त्यामुळे भविष्यात दुर्घटना टाळण्यास मदत होणार आहे
सचिन कांडगे – स.पो.नि.पारगाव कारखाना

Related Articles

ताज्या बातम्या