मंचर प्रतिनिधी
जलसंपदा विभागाच्या कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आंबेगाव
तालुक्यातील डिंभे धरणातून (हुतात्मा बाबू गेणू जलाशय) उजवा कालव्याला पाणी सोडल्याने शेतकरी सुखावला आह आहे शेतकऱ्यांनी पाणी जपून वापरावे असे आव्हान जलसंपदा विभागांनी केले आहे.
या पाण्याचा उपयोग आंबेगाव- शिरूर तालुक्यांतील सुमारे ६० गावांतील शेती पिकांना फायदा होणार असून, याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
आंबेगाव, शिरूर तालुक्यांतील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला होता. उजव्या कालव्याला पाणी सोडावे या संदर्भात वर्तमानपत्रात व शेतकऱ्यांनी माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांना कालव्याला पाणी सोडण्याबाबत निवेदन दिले होते. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून अनेक शेतकऱ्यांनी उसाच्या शेतात उन्हाळी नगदी पिके घेतली आहेत. उन्हाळी पिकांना पाण्याची गरज भासत आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने काही ठिकाणी शेती पिकांनी माना टाकायला सुरुवात केली होती.
उजव्या कालव्याला नियमित पाणी सोडण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत डिंबा धरणाचा मोलाचा वाटा राहिला आहे.
चौकट
पूर्व आंबेगावात उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. शेतकऱ्यांच्या वतीने माजी मंत्री आमदार वळसे पाटील यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. उजव्या कालव्याला पाणी सोडल्यामुळे पाणीटंचाईच्या काळात शेती पिकांना दिलासा मिळणार आहे.
अनिल वाळुंज, माजी अध्यक्ष, खरेदी-विक्री संघ, आंबेगाव





