spot_img
spot_img
spot_img

निसर्ग दाता पुस्तकास ग्रंथ पुरस्कार

मंचर प्रतिनिधी

निरगुडसर ( ता. आंबेगाव ) येथील पोलीस पाटील, पर्यावरण अभ्यासक, स्तंभलेखक विठ्ठल वळसे पाटील लिखीत “निसर्ग दाता” या वैचारिक ग्रंथास पुणे
येथे राज्यस्तरीय शासकीय मराठी साहित्य संमेलन – २०२६ संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
नुकतेच पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे पुणे महानगरपालिका, मराठी भाषा संवर्धन समिती, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी (यशदा) व संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय राज्यस्तरीय शासकीय मराठी साहित्य संमेलन – २०२६ पार पडले. या संमेलनात विविध लेखकांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

“ग्रंथ पुरस्कार” महेश भागवत अतिरिक्त महासंचालक कायदा सुव्यवस्था तेलंगणा, सचिन इटकर क्षेत्रीय संचालक महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ, शेखर गायकवाड अतिरिक्त महासंचालक, डॉ. किरण धांडे यशदा प्रभारी अधिकारी, सुनील महाजन संवाद पुणे संचालक, व्यंकटेश कल्याणकर माध्यम व प्रकाशन विभाग यशदा या मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक, स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.

निसर्ग दाता या पुस्तकाला विविध साहित्य संस्थांनी गौरविले आहे. या ग्रंथात पर्यावरण विषयक वैचारिक तत्वज्ञान मांडले

Related Articles

ताज्या बातम्या