spot_img
spot_img
spot_img

उत्तर पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानामुळे कांदा पिकाला फटका

 

मंचर प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे उत्तर पुणे जिल्ह्यात खेड आंबेगाव जुन्नर शिरूर या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहे
 धुके आणि ढगाळ वातावरण याचा फटका वारंवार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यात राज्यातील  काही भागात पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे
ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी
चांगलाच धास्तावला आहे.
ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव वाढू लागला आहे. मावा, करपा असे रोग पडू लागल्याने कांद्याच्या पातीचे शेंडे पिवळी पडू लागले आहेत. तर कांद्याला पिळ पडत असल्याने महागडी रोपं खरेदी करुन लागवड केलेल्या कांद्याला जपण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी औषधे खरेदी करुन फवारणी करण्याची वेळ येतेय. फवारणी न केल्यास कांदा खराब होऊन उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची भिती शेतकऱ्यांना सतावत आहे.

 

केवळ कांदाच नाही तर द्राक्षाला बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे.  शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार  ढगाळ वातावरणामुळे बुरशी पसरुन त्यावर रोग पडतात आणि पात पिवळी पडते त्यामुळे कांद्याची वाढ थांबून त्याचा आकार लहान होण्याची शक्यता अधिक असते.

 

 कांद्या बरोबरच  द्राक्ष उत्पादन पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या