
मंचर प्रतिनिधी
जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा शनिवार ( दि. २१ ) रोजी उत्साहात संपन्न झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य वाघमारे मॅडम यांनी दिली

विद्यालयात आयोजित बाल आनंद मेळावा विद्यार्थ्यांनी बनवलेल्या चविष्ट खाद्यपदार्थांच्या स्टॉलमुळे एकच गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले . या कार्यक्रमात मुलांमध्ये व्यावहारिक ज्ञान, व्यवहार कौशल्ये, नेतृत्व आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ ठरला, जिथे त्यांनी खरेदी-विक्रीचा अनुभव घेतल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधतात यावेळी तीसहून अधिक विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले होते

या मेळाव्यात पालकांसह परिसरातील नागरिकांनी हजेरी लावत मुलांचे प्रोत्साहन वाढवले.
विद्यार्थिनींकडून विविध प्रकारचे फळे पालेभाज्या फळभाज्या संतुलित आहार तसेच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले गेले होते.
बालआनंद मेळाव्यानिमित्त विद्यार्थिनींनी नफा तोटा, व्यवहार ज्ञान तसेच संवाद कौशल्य आदींची माहिती झाली.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले





