spot_img
spot_img
spot_img

लोणीत महाशिवरात्री यात्रोत्सव निमित्त धावले ३५० बैलगाडे

लोणी-धामणी प्रतिनिधी (  प्राध्यापक अरुण गोरडे )

लोणी (ता.आंबेगाव) येथील महाशिवरात्री यात्रेनिमित्त दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये ३५० बैलगाडा मालक सहभागी झाले होते.एकूण इनाम दोन लाख ७५ हजार १११ होता. इतर अनेक आकर्षक बक्षिसे होती.

प्रथम क्रमांक फळीफोडीचा मान बबलू संजय पोखरकर- वडगावपीर व कचरू रामभाऊ पानमंद- चांडोह यांच्या बैलगाड्यांनी मिळवला.
द्वितीय क्रमांक मित्रप्रेम बैलगाड संघटना- शिरदाळे व बाळासाहेब मनाजी मांदळे- वाफगाव.
तृतीय क्रमांक शुभम शाम शेळके- पाबळ व दिपक सुरेश खैरे- हिवरे.
चतुर्थ क्रमांक तन्वी बिल्डर बाबूशेट आदक- मांदळेवाडी व आप्पा बबन मांदळे- मांदळेवाडी.
गाड्याला फळी फोडीचा मान मिळाला.
तर घाटाचा महाराजा जयमल्हार बैलगाडा संघटना आतूल सिनलकर- तळेगाव व घाटाचा राजा विराज विकास कुटे- वाघोली या गाड्याला मिळाला.

 

 

बैलगाडा शर्यतीनंतर रात्री पांडूरंग मुळे सह तूकाराम खेडकर मांजरवाडीकर  यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम झाला. शरद बॅकेचे संचालक अशोक आदक पाटील. तंटा मुक्तीचे अध्यक्ष संतोष पडवळ, चंद्रकांत गायकवाड, पोलिस पाटील संदिप आढाव, सतिश थोरात, बबन वाळूंज, बाळासाहेब गायकवाड, दिलीप आदक, गणेश गायकवाड, नामदेव वाळूंज यांनी व
ग्रामस्थांनी बैलगाडा घाटाची व्यवस्था पाहिली.
यात्रा उत्सवाच्या काळात पारगाव कारखाना पोलीस स्टेशनच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लोकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदोबस्ताचे काम चोख पार पाडले.

Related Articles

ताज्या बातम्या